महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे यांनी अतिवृष्टीमुळे विखुरलेल्या मुस्लिम कुटुंबाला दिला आर्थिक मदतीचा हात

सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे अतिवृष्टीमुळे नदीच्या पुराचे पाणी शेख अफ्रोज यांच्या घरात घुसल्याने पूर्ण घर उध्वस्त झाले असता कुटुंब उघड्यावर पडल्यामुळे सुरेश भैया नागरे यांनी विखुरलेल्या मुस्लिम कुटुंबाला दिला आर्थिक मदतीचा हात.
ढेंगळी पिंपळगाव येथील पायाने अपंग असलेले शेख अफरोज यांच्या पडलेल्या घराची पाहणी करून सुरेश भैय्या नागरे यांची 11000 हजार रुपयाची अर्थीक मदत आज काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब दादा राऊत,तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब जोगदंड,काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तहेसीन देशमुख यांच्या हस्ते शेख अफ्रोज यांना देण्यात आली.
यावेळी दामोदर कदम, शेख नबी, माजी.सरपंच चिंतामण दौंड, शेख अफसर, बापुराव सोळंके, शेख साबेर, कैलास कदम, शेख अतीक, प्रभाकरराव इंगळे, विनोद शिंदे, रुशी अंभोरे, कटारे, यांच्या सह ढेंगळी पिंपळगाव येथील गावकरी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button