जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील प्रकार..
कौसडी प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील असलेल्या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानातून अवैध मार्गाने इतर गावात दारूची विक्री केली जात आहे. यामध्ये कौसडी परिसरात असलेले कुपटा, गुळखंड फाटा,आडगाव दराडे, पिंपळगाव गायके, भांगापूर, चिमणगाव यास इतर गावातील अवैध मार्गाने दारू विक्री करणारे विक्रेत्यांना देशी दारूचा पुरवठा केला जातो.
कौसडी येथील देशी दारूच्या दुकानाचा परवाना एका व्यक्तीच्या नावाने आहे तर ही देशी दारूची दुकान दुसराच व्यक्ती चालवत आहे. दारूच्या दुकानाचा परवाना भाड्याने घेतलेला आहे. परवान्याचा भाडा व कामगारांची मजुरी निघून जास्तीत जास्त मुनाफा मिळावे म्हणून सरकार मान्य असलेल्या देशी दारूच्या दुकानातून अंधाराचा फायदा घेत दररोज दोन कामगारांच्या साह्याने दुचाकीवर अंदाजे 20 ते 22 देशी दारूचे बॉक्स पिंपळगाव गायके, चिमणगाव, कुपटा, गुळखंड फाटा, भांगापूर, आडगाव दराडे यासह इतर गावातील अवैध दारू विक्रेत्यांना पुरवठा केला जात आहे. अवैध मार्गाने देशी दारू विक्रीमुळे सरकार मान्य देशी दारू दुकान चालकाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे.
दारूमुळे अनेक व्यक्तींनी आपले जीव गमावले असून अनेकांचे संसार मोडले आहे याच दारूमुळे गुन्हेगारी वाढत आहे. बोरी पोलीस ठाण्याचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी लक्ष देऊन सरकार मान्य देशी दारूच्या दुकानातून अवैध मार्गाने विक्री होणाऱ्या दारूच्या पुरवठ्यावर पोलिसांचा ठप्पा लावून अवैध मार्गाने दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराला पोलिसगिरी दाखवणे गरजेचे आहे.