दि. २६ ऑक्टोबर शणीवार रोजी पीएम श्री जि.प.के.प्रा.शाळा डासाळा येथे दीपावलीनिमित्त सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने सोहळा दात्तृत्वाचा हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील शिखरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड शुकाचार्य शिंदे निर्मिक क्लासेस संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती .
याप्रसंगी शाळेतील एकल पालकत्व असणाऱ्या दहा पाल्यांना ड्रेस व फराळ दिवाळीनिमित्त भेट म्हणून देण्यात आला तसेच शाळेतील शालेय पोषण आहार कर्मचारी आशामती गजमल, कालींदा गजमल, सविता जाधव तसेच सोनाली काजळे यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यातर्फे भाऊबीज म्हणून साडी तसेच शाळेत गणित विषय अध्यापन करण्यासाठी येणारे पवार यांना ड्रेस दिवाळी भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांनी केले भेटवस्तू देणे म्हणजे प्रेम स्नेह व आपुलकी व्यक्त करणे तसेच नातेसंबंध दृढ करणे होय असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आपल्या मनोगतात या जगात प्रत्येकजण मुठ धरून जन्माला येतो आणि त्याला हात पसरून जावे लागते जे काही कमावले आहे ते मागे सोडावे लागते ,रिकाम्या हाताने जावे लागते म्हणून दयाळू व्हा तसेच व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे कौतुक केले व असेच सामाजिक उपक्रमातून शाळेचा व गावाचा विकास होतो असे मत व्यक्त केले अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकरी यांनी सहकार्य केले