जिंतूर :दि.28 ऑक्टो. रोजी जिंतूर विधान सभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी मोठी रॅली काढली. या रॅलीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते वाहनावर विराजमान होते. मुख्य बाजारपेठेसह चौक व ठिकठिकाणीया रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघाच्या विका साकरीता आपण कटि बध्द आहोत, अशी ग्वाही दिली. समाजा तील विविध वर्गांना न्याय मिळवून देण्याचं काम बोर्डीकर कुटूंबि यांनी सातत्याने केले आहे. या मतदारसंघात पायाभूत सोयी-सुवि धा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न केले आहेत. पुढील पाच वर्षात आमदार झाल्यानंतर आणखीन जोमाने काम करील असे भाषणामध्ये सांगितले. हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष शक्तिप्रदर्शनाला उपस्थित होते.व भरपूर महिला व पुरुषांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला