हिंदूंचा सगळ्यात मोठा सण दीपावली या काळामध्ये बळजबरीची लोड शेडिंग महावितरणणे करू नये. याबाबतची चर्चा महावितरणचे उपअभियंता केंद्र साहेब यांच्यासोबत झाली होती व त्यांनी असे होणार नाही असे आश्वासित केले होते. तरीपण दिवाळीच्या पहिल्या दिवशीच सेलू शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी सकाळी 05 वाजता लाईट गायब झाली व लाईटचे येणे जाणे चालू होते. याचा नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. याचा निषेध म्हणून आज महावितरणच्या कार्यालयात गेले असता तिथे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते याचा निषेध म्हणून महावितरणचे उपअभियंता केंद्रे साहेब यांच्या टेबलवर दिवाळीच्या दिवा भेट देण्यात आला व पुन्हा दिपावली च्या काळात लाईट गेल्यास महावितरण कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
यावेळी जयसिंग शेळके, अर्जुन चव्हाण, गणेश ढेंगळे, कृष्णा चव्हाण, राजू घोडके, पांडूरंग कापसे, शिव राऊत उपस्थित होते.