राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघास दुहेरी सुवर्णपदक व रौप्यपदक

सेलू ( सतिशआकात) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया  व कर्नाटक टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने दि 22 ते 24 नोव्हेंबर 2024 रोजी बंगलोर येथील श्री कांतीरावा स्टेडियम येथे 26 व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
           महाराष्ट्र राज्य संघाला  महिला व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर पुरुष गटात रौप्यपदक पटकावले.
           पुरूष गटात महाराष्ट्र राज्य संघाने  तेलंगणा, दिल्ली  कर्नाटक  संघास साखळी सामन्यात बाद करून  उडीसा सोबत उपांत्यपूर्व सामन्यात 2-0 ने विजय प्राप्त करत उपांत्य सामन्यात केरळ संघा सोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने 2-1 ने विजय प्राप्त करत अंतिम फेरीत  प्रवेश केला,अतिम सामना गुजरात विरुद्ध आतिशय चुरशीचा व रोमहर्षक झाला या सामन्यात महाराष्ट्र संघाला 2-1 सेट मध्ये पराभव पत्कारावा  लागला महाराष्ट्र संघास रौप्यपदक वर समाधान मानावे लागले.
या संघात निलेश  माळवे कर्णधार, निनाद  राहटे, विश्वजित  खांडेकर, चंद्रशेखर  ताटे, विजय केंद्र, पठाण शोएब खान या खेळाडूंचा सहभाग होता , या संघास प्रशिक्षक सतिश नावाडे यांचे लाभले.
       महिला गटात महाराष्ट्र संघाने  दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेश संघास साखळी फेरीत बाद करत उपांत्यपूर्व फेरीत केरळ संघा सोबत अतिशय रोमांचक सामन्यात महाराष्ट्र संघाने 2-1 ने विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत प्रवेश करत  यजमान कर्नाटक संघासोबत  2-0 सेट जिंकून अंतिम सामन्यात  बलाढ्य आशा गुजरात संघा सोबत रोमहर्षक चुरशीच्या लढतीत  महाराष्ट्र संघाने 2-1 सेट मध्ये जिंकून सुवर्णपदक पटकावले.महाराष्ट्राच्या विजयी संघात कर्णधार निकिता  थावरे  निता थावरे, अक्षरा  पवार, सोमेश्वरी  टाक, श्रेया उपासे आणि वनश्री कदम या सहभागी होत्या व या संघास प्रशिक्षक सोनपसारे राजकुमार यांचे लाभले.
               मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्र संघाने पंजाब, दिल्ली तमिळनाडू या संघाना सहज नमवत उपांत्य फेरीत मध्ये  प्रवेश करत सामना गुजरात संघा सोबत 2-0ने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम सामना केरळ संघास विरुद्ध   (2-0) महाराष्ट्र संघाने विजय प्राप्त केला या संघात राहूल पेटकर, प्राची कडणे
यांचा सहभाग होता.तर मंदार कुष्टे व  प्रतिक्षा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले
           या  उज्वल यशा बद्दल टेनिस व्हॉलीबॉल चे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, महासंघाचे सरचिटणीस डॉ.रितेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी, राज्यसचिव गणेश माळवे, उपाध्यक्ष प्रा. नंदकिशोर देशपांडे, डॉ.आबासाहेब सिरसाठ, किशोर चौधरी, रणजीत चामले , संजय ठाकरे सन्मानित राज्य सदस्य, विभागीय सचिव रामेश्वर कोरडे, जिल्हा अध्यक्ष व सचिव या सर्वांनी शुभेच्छांचा देऊन अभिनंदन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button