सेलू येथील फुलेनगर येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय युवक हा व्यसन आहरी होता. त्या कारणे सदरील व्यक्तीस व्यसनमुक्तीच्या गोळ्या चालू असल्यामुळे तो एकटा राहून स्वतःचा राहत्या घरी पत्राच्या एंगलला गळ्यातील मफलरच्या साह्याने गळफास घेतला आहे. सदरील घटना ही दिनांक 25 11 2024 रोजी दुपारी 5.30 च्या दरम्यान घडली आहे. मयत झालेल्या युवकाचे नाव सचिन रावसाहेब मुकणे वय वर्ष त 33 व्यवसाय मजुरी विवाहित होता. सदरील घटना कळतात सेलू पोलीस स्टेशन येथे रावसाहेब त्रंबक मुकणे यांच्या खबरीनुसार सेलू पोलीस स्थानकामध्ये कळविण्यात आले घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट देऊन नोंद दाखल करून घेतले.