जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम एडवोकेट श्री मनोज जी सारडा तसेच सुप्रसिद्ध व्यापारी सचिन चिद्रवार यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे वेळी श्री गंगाधरराव बोर्डीकर बोलताना म्हणाले की जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना विकासाच्या कामाबरोबरच सामाजिक कार्याची देखील मोठी आवड असल्याने आणि आपण समाजाचा देणं लागतो या हेतूने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात यावा अशी इच्छा आमदार दीदींची असल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे भविष्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे गार्डन विकसित केले जाईल असा शब्द त्या निमित्ताने त्यांनी दिला. यावेळी आपले मनोगत एडवोकेट मनोज सारडा नपचे माजी नगर अध्यक्ष श्री सचिन गोरे भाजपा तालुकाध्यक्ष अँड विनोद राठोड नाईक तसेच डॉ. पंडित दराडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री रमणजी तोष्णीवाल यांनी केले. या कार्यक्रमाचे वेळी जिंतूर शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी आणि गोभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….!
त्यानंतर श्री संदीप महाराज शर्मा यांच्या गोशाळेतील गाय आणि वासरांना ढेप आणि चारा वाटपाचा कार्यक्रम ह भ प श्री संदीप महाराज शर्मा व श्री अशोक अच्छा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय जिंतूर येथे सर्व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री गंगाधरराव बोर्डीकर, नपचे माजी नगराध्यक्ष श्री सचिन गोरे भाजपा तालुकाध्यक्ष अँड विनोद राठोड नाईक ब्रिजगोपालजी तोष्णीवाल अँड गोपाळ रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व दिव्यांग शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले. ज्यामध्ये निवासी मतिमंद विद्यालय जिंतूर, संत पाचलेगावकर महाराज निवासी अस्थिभंग शाळा जिंतूर निलेश अपंग कार्यशाळा जिंतूर, किशनराव वसेकर निवासी अस्थिभंग विद्यालय जिंतूर, या शाळेचा समावेश करण्यात आलेला होता. सदरील कार्यक्रमाचे आयोजन बोर्डीकर मित्र मंडळ जिंतूर च्या वतीने करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे वेळी कृउबा चे काळे साहेब आणि सर्व कर्मचारी तसेंच रमन तोष्णीवाल, आबासाहेब खेत्रे गोविंद दायमा, राजेश देवकर डॉक्टर पंडित दराडे अँड गोपाळ रोकडे विकास जाधव, कैलास खंदारे ,गजानन वराड, रवी घुगे, गणेश कुरे विजय जाधव, संतोष राठोड, संतोष देशमुख,
राजेंद्र थिटे,उत्तमराव जाधव, रामराव चव्हाण, दिगंबर चव्हाण, प्रमोद चव्हाण, विजय वाकळे, दत्ता नवले, माधव दराडे, भानुदास वाळके, किशोर जाधव, शिवाजीराव काकडे, शिवाजी काळे, विलास भंडारे रोहित देशपांडे रामराव हुलगुंडे सुनील घुगे केहालकर, सुनील मस्के प्रदीप चौधरी सुधाकर कुकडे भगवानराव वटाणे, रामभाऊ जाधव, सुधाकर जाधव,रोहित चव्हाण, पांडुरंग आडे,गणेश पवार, फिरोज भाई हकीम भाई मतीन तांबोळी, सुमित सूर्यवंशी गणेश दराडे बंटी जाधव आदिनाथ गिरी, अर्जुन गरड आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.