विभागीय कथाकथन स्पर्धेसाठी ‘मृणाल’, अक्षरा’ ची निवड..

हेलस साने गुरूजी कथामाला व मानस फाऊंडेशनचा उपक्रम, परभणी जिल्हाफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू/ परभणी : पूज्य साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साने गुरूजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सहकार्याने शनिवारी, १४ डिसेंबररोजी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची परभणी जिल्हास्तरीय फेरी पार पडली. २९ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. बालगटातून अक्षरा गजान पवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू), तर किशोर गटात मृणाल महेश कुलकर्णी (अरबिंदो अक्षर ज्योती, परभणी) या स्पर्धकांनी सर्वप्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही स्पर्धकांची मराठवाडा विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात ही स्पर्धा झाली. पर्यवेक्षक रोहिदास मोगल, उद्घाटक साहित्यिक डॉ.सुरेश हिवाळे, परीक्षक म्हणून प्रसिद्ध कथाकार राम निकम, प्रा.के.डी.वाघमारे तसेच कथामाला समन्वयक बाबासाहेब हेलसकर, जिल्हासंयोजक डॉ.काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रारंभी साने गुरूजी आणि दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले. पल्लेवाड यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर, कीर्ती राऊत, धनश्री देशमुख, भगवान पावडे तसेच अरूण रामपूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
परभणी जिल्हाफेरी निकाल असा : किशोर गट – प्रथम मृणाल महेश कुलकर्णी (अरबिंदो अक्षर ज्योती, परभणी), द्वितीय श्रद्धा डिगांबर काकडे व तृतीय स्वरा सुधीर देशपांडे (नूतन कन्या प्रशाला सेलू), बाल गट – प्रथम अक्षरा गजानन पवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू), द्वितीय साक्षी कृष्णा राठोड, तृतीय-राठोड अमोल ईश्वरी (जिपप्राशा.पार्डी)

अंधदिव्यांग योगेश्वरीने जिंकली मने

पूज्य साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हेलस येथील कथामाला व मानस फाउंडेशनच्या वतीने शनिवारी सेलू येथे आयोजित विभागीय कथाकथन स्पर्धेच्या परभणी जिल्हाफेरीतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button