सेलू : शंभर रुपये उसने मागण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना हेमंतनगर सेलू भागात घडली. याप्रकरणी गुरुवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेश माणिकराव अवचार (२८, रा. हेमंतनगर, सेलू ) यांनी फिर्याद दिली की, ८ डिसेंबरला शंभर रुपये उसने मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी रोडने मारहाण केली. राजू कांबळे, राहुल कांबळे, बालाजी कांबळे यांनी मारहाण तर अहिल्याबाई कांबळे यांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुरुवारी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१),११७(२), ३५२,३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.