तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मागील २९ वर्षापासून संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख पदी कार्यरत असलेले प्रा. एच.टी. शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी संपादित करत महाविद्यालयाचा सन्मान वाढविला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत डॉ. व्यंकट शंकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली “आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेतील खेळाडूंची अभिवृत्ती सहभाग व कामगिरी: एक अभ्यास” या विषयावर सखोल असे संशोधन करत शोध प्रबंध सादर करून शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी संपादित केली.
त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री.बी.आर.तोष्णीवाल,सचिव श्री. यू.एम.शेळके,उपाध्यक्ष श्री.सुभाषअप्पा एकशिंगे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री. रमणजी तोष्णीवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस.जी.तळणीकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.