
सेलू प्रतिनिधी:-
सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमी ची विद्यार्थीनी शुभांगी राऊत यांची मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे गटकळ अकॅडमी येथे स्वागत करण्यात आले. यावेळी अकॅडमीचे संचालक रामेश्वर गटकळ सर,दीपक गटकळ सर, ताठे सर, राठोड सर, P. S.I गणेश पवार सर, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली गजानन शिरसागर,शुभांगी राऊत यांचे वडील विश्वनाथ राऊत, भाऊ लिंबाजी राऊत, मामा गजानन कंठाळे, शिवाजीराव खाडे, गोविंद जोशी,महेश राऊत व अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.