
सेलू (. ) भारतीय लॅक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राज्यस्थान लॅक्रॉस असोसिएशन वतीने आयोजित ३री राष्ट्रीय सिनिअर लॅक्रॉस क्रीडा स्पर्धा दि.७ते ९ फेब्रुवारी दरम्यान उदयपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सबज्युनिअर महाराष्ट्र राज्य मुलांच्या संघाने कास्य पदक पटकावले .
या संघाचा कर्णधार गोपीनाथ कंठाळे ,निनाद चोघुले ,वेदांत मगर ,करण गोरे, सागर आडणे, ओम नेमाडे ,कार्तिक खिस्ते ,अभय वाघ, आदित्य खिस्ते, प्रणव घोडके, निशांत सोनवणे, दिशांत राउत, वरद मगर ,सिद्धार्थ बच्छाव, अजय चव्हाण साईनाथ दराडे आर्णव वाव्हळे, साहिल वाव्हळे, आदित्य महाशिवदळे ,ओम काकडे ,या खेळाडुंचा समावेश होता .
या यशाबद्दल महाराष्ट्र लॅक्रॉस असोसिएशन अध्यक्षा सुमेधा ठाकूर महाराष्ट्राचे सचिव मोहम्मद बाबर, परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष कठाळे, परभणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश माळवे, सचिव प्रशांत नाईक, राजू कोळी ,विशाल पवार, तांञिक समिती प्रमुख जबाक , संतोष शिंदे यांनी अभिनंदन केले या संघास प्रशिक्षक राहुल घाडगे सह. प्रशिक्षक कुणाल चव्हाण व्यवस्थापक सत्यम बरकुले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षांव होत.