
सेलु :- असगर खान
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचालित यासेर उर्दू शाळेत आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी आनंद नगरी मेळावा संपन्न झाला. या आनंद नगरीचे उद्घाटन परभणी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते सय्यद अब्दुल कादर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान खैरुल्ला खान, प्राध्यापक वसीम सर, शेख असद, रियल स्टेट ऑनर याहीया खान, सय्यद इम्रान, यासेर उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कासमी तहेसीन सुलताना उपस्थित होत्या.
या आनंद नगरी मध्ये विविध चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांचे एकुण 100 स्टॉल लागण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान संपादन व्हावे या हेतुने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अनंत मेळाव्याला सेलु वासीयांकडून व शिक्षण प्रेमियांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी पालक वर्गांनी पण मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
यावेळी शाळेतर्फे घेण्यात आलेल्या विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या आनंद मेळाव्याला शहरातील इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हजेरी लावली. हा आनंद मेळावा यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान, सय्यद इम्रान, सय्यद अजीम, सय्यद अमन, शेख साजिद, सय्यद खिजर, जहीर अंसारी, असलम खान, फ़ज़ल सिद्दीकी, अजमत पठाण, वसीम पठाण, व महिला शिक्षीकांच्या प्रयत्नने यशस्वीपणे पार पडला.