
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने आयोजन..
सेलू येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी शिवजयंती निमित्त 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
ग्रामीण भागातील विविध शाळांमधील 700 विद्यार्थी व शहरी भागातील 1300 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत अशी माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टी सचिव रामेश्वर शेरे व दत्तात्रय सोळंके यांनी दिली आहे.
ही परीक्षा सेलू येथे श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय व नूतन विद्यालय या दोन केंद्रावर घेण्यात येणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्री केबा विद्यालय तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नूतन विद्यालय या परीक्षा केंद्राचे नियोजन केलेले आहे. ही सामान्य ज्ञान परीक्षा संपूर्णपणे शिवचरित्रावर आधारित असून 100 गुणांची असेल. या परीक्षेचे संपूर्ण नियोजन विलास खरात किरण जाधव प्रशांत देशमुख करीत असून त्यांना रामराव बोबडे रामराव गायकवाड तानाजी भोसले आत्माराम हरकळ नानासाहेब पवार, किरण खरात, सुरेश कवडे, किरण नंद, ईश्वर अर्जुने आदी सहकार्य करत आहेत.