
ईगल फाउंडेशन सेलू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कराटे कलर बेल्ट वितरण करण्यात आले कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी रासवे होते व प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यवंशी सर , सतीश आकात, विजय राठोड, डाखोरे सर, बाबुराव साबळे सर, घुले सर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई येथे झालेल्या कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेमध्ये पात्र होऊन ओमकार घुले , अजय पौळ, मिम खातून यांनी यश प्राप्त केले .या सर्व यशस्वी मास्टरचा स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . तसेच ईगल फाउंडेशन सेलू यांच्या
वतीने सुरु असलेल्या क्लासेस मधील कराटे प्रशिक्षण घेत असनाऱ्याला 20 विद्यार्थांना / विद्यार्थिनीला मान्यवरांच्या हस्ते कलर बेल्ट वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदपल्ले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भोगावकर यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक फिरोज पठाण व रितेश आठवे यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.