वाढदिवस साजरा न करता त्या पैशातून तीन शाळेला ग्रंथ भेट.

सेलू : सेलू येथील नूतन कन्या प्रशालेतील सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याला फाटा देत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा चांगल्या कार्यासाठी विनियोग व्हावा म्हणून त्याच बरोबर विध्यार्थ्यां मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या उद्दात हेतूने सेलू येथील शारदा विद्यालय, यशवंत प्राथमिक शाळा व सेलू तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा निपाणी टाकळी येथे डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी आपले स्वतःचे साठ वर्ष पूर्ण करून एकसष्टव्या वर्षात पदार्पण केल्या बद्दल प्रत्येक शाळेस एकसष्ट ग्रंथाचा संच विध्यार्थाना वाचण्यासाठी प्रशाळेच्या ग्रंथालयास भेट दिला. या प्रसंगी जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भुते सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे,सरपंच सुनील सावंत,उपसरपंच हरकळ,माजी चेअरमन अविनाश शिंदे आदीजन उपस्थित होते.शारदा विद्यालयात मुख्याध्यापक डी.डी.शिंदे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साखरे सर,सहशिक्षक भरत रोडगे,सुभाष मोहकरे सर,हिरे सर,बी आर सी च्या केंद्र प्रमुख काळे मॅडम,नूतन कन्या प्रसालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.संगीता खराबे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यशवंत प्राथमिक शाळा येथे संस्थेचे अध्यक्ष मा.मुकेश हरिभाऊ काका बोराडे,मुख्याध्यापक गोरे सर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक थटवले सर, वामन सर, सौ.कानडे मॅडम आणि सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. तिन्हीं शाळेतील मुख्याध्यापकांनी डॉ.शिवाजी शिंदे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शाळेच्या ग्रंथालयास ग्रंथ भेट देऊन विद्यार्थी यांना वाचण्यांची आवड निर्माण करण्यासाठी जो उपक्रम घेतला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी त्याच्या कारकीर्दीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रशालेत जे उपक्रम राबविले ते वाखाण्याजोगे आहेत.या उपक्रमा बद्धल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कार्यक्रमांचे सूत्र संचालन अनुक्रमे भुते सर,सुभाष मोहकरे सर,सौ.कानडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन भुते सर,मुख्याध्यापक डी.डी.शिंदे सर,मुख्याध्यापक गोरे सर, आदिनी केले. कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button