सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सेलू शहरात शिवप्रतिष्ठानतर्फे भव्य ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणूक…!

या मिरवणुकीत कोल्हापूर येथील शांतीदूत मर्दानी आखाडा यांची यूद्धकलेचे प्रात्यक्षिके, हल्गी पथक, हल्गी सम्राट पथक, स्थानिक हिंदू मूलींचे झांज-लेझीम-ध्वज पथक, बॅन्ड पथक व शिवछत्रपतींची मूर्ती, ग्रामदैवत बाबासाहेब महाराज यांची मूर्ती, विठ्ठल रखुमाई मूर्ती, महाकालेश्वर मूर्ती असे देखावे सादर करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ येथून हि मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावर काढण्यात आली व शिवतीर्थ येथेच पोहोचली.
सदरील मिरवणूक हि अत्यंत शिस्तबद्ध व पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली, सेलू शहरातील शिवजन्मोत्सवाची हि ऐतिहासिक मिरवणूक ठरली.
समारोप प्रसंगी शिवछत्रपतींच्या जिवन चरित्रावरील जिवंत देखावा दाखवण्यात आला.
यामध्ये हजारो हिंदूमाता भगिनींच्या व शिवभक्तांच्या वतीनं शिवछत्रपतींच्या स्मारकाची सामूहिक आरती करण्यात आली.


भव्य आतिषबाजीने या मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button