दानशुर व्यक्तीमत्वांनी या स्तुत्य उपक्रमास आर्थिक सहकार्य करावे…..काॅम्रेड आशोकराव उफाडे
सेलू ÷ शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हात मदतीचा शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन काॅम्रेड आशोकराव उफाडे यांच्या हस्ते
दि. 26 जुन बुधवार रोजी वसंतराव खारकर सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा के.बा.शिक्षण संस्थेचे संचालक जयवंतराव डिग्रसकर, उद्घाटक काॅम्रेड आशोकराव उफाडे, प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार विजयराव मोरे, जेष्ठ पत्रकार रामराव सोनवणे, डाॅ.किशोर जवळेकर, संयोजक सुनिल गायकवाड, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर, पि.के शिंदे. निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे, महसुल सहाय्यक प्रदिप मुनेश्वर, सोशल मिडीया अध्यक्ष सतीश आकात, मुख्याध्यापक बालासाहेब हळणे,सिद्धार्थ एडके आदि उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व राजर्षी शाहू महाराज आणि कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक संयोजक सुनिल गायकवाड यांनी केले ते म्हणाले कि या उपक्रमाचे प्रेरणास्थान कै.दत्तात्रय हेलसकर असुन त्यांच्या प्रतीमेस अभिवादन करून हात मदतीचा उपक्रम हा शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सहकारी मित्र यांच्या पुढाकारातून हा उपक्रम चालतो देणाऱ्याचे हात वाढत चालले असून मागील सहा वर्षांत 2337 विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून 7 वर्ष सुरू आहे
या मध्ये वही, पेन,दप्तर,गणवेश तर ज्या विद्यार्थास पालक नाहीत पण शिक्षणाची आवड आहे अशा मुला मुलींना वर्षभर शालेय साहित्य पुरवले जाते याही वर्षी शहरातील पाच तर ग्रामीण एक एकूण सहा शाळेत हात मदतीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन गीत शुकाचार्य शिंदे यांनी गाऊन अभिवादन केले.
काॅम्रेड आशोकराव ऊफाडे यांनी विद्यार्थास मार्गदर्शन केले ते म्हणतात आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यास आपण मेहनतीने अभ्यास करून यश संपादन करत सामाजिक उपक्रमातुन मिळालेल्या शालेय साहित्याचा उपयोग आपण चांगला अभ्यास करण्यासाठीच वापर करावा
डाॅ, किशोर जवळेकर, पि.के.शिंदे, रामराव सोनवणे यांनी ही आपल्या मनोगतात या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करणाऱ्या दानशुराचे आभार मानत संयोजक सुनिल गायकवाड हे भाजीपाला विकून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिब व होतकरू विद्यार्थास शालेय साहित्य वाटप करण्यात पुढाकार घेतात म्हणून त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जयवंतराव डिग्रसकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, सुत्रसंचलण मंगेश कुलकर्णी, तर आभार प्रदिप शिंदे यांनी माणले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी नानासाहेब गायकवाड, विठ्ठलराव काळे, बबलू बदाले, आदिनी परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न झाला.