विहिरीमध्ये मृत अवस्थेत सापडले सात महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक..

सेलू प्रतिनिधी

मनुष्य जातीला काळिमा फासणारी घटना आज सेलू तालुक्यातील वालूर गावामध्ये घडली दिनांक 27 जून 2024 रोजी सायंकाळी 5-6 च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने अंदाजे सात महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला लिंबाजी रामराव कुपनवार राहणार वालूर यांच्या शेतीमधील असणाऱ्या विहिरीमध्ये अपत्य जन्माची लपवणूक करण्याचा उद्देशाने मृत अवस्थेत विल्हेवाट न लावता अंत्यविधी न करता टाकून दिले आहे म्हणून लिंबाजीराव कुपनवार यांच्या सांगण्यानुसार सेलू पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस हवालदार हिंगे यांच्याकडे देण्यात आला आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button