सेलू प्रतिनिधी
ज्ञानाई दिंडीचे यशस्वी 18 वर्ष पूर्ण करून तालुक्यातील ज्ञानाई दिंडी चे आळंदी कडे प्रस्थान दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 06 वाजता सेलू येथील मार्केट यार्ड परिसरामध्ये आळंदी कडे जाण्यासाठी दिंडीचा श्री गणेशा केला त्यानंतर दिंडीचे चालक मालक हरिभक्त परायण जयराम महाराज तांगडे यांनी दिंडीची धुरा सांभाळत आपुलकी, माया,व आद्यात्म यांची सांगड घालून शेकडो वारकऱ्यांनी त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रवाहात हरिनामाचा जयघोषात पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन करून दिंडी आळंदी कडे प्रस्थान करणार आहे. प्रस्थानाच्या वेळी ह भ प जयराम महाराज तांगडे वाहनांचे पूजन करून मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी हेमंतराव आढळकर,रामनाना खराबे,डॉ आबासाहेब डख,रणजीत गजमल,भारत डख,रामराव ढोक,मनिष कदम,काशिनाथ घुमरे, पंडितराव वाघ,विठ्ठलराव आकात,शिवाजी शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती मध्ये
ज्ञानाई दिंडीचे भक्तांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दिंडी सोहळ्याची रवानगी करण्यात आली.