सेलू प्रतिनिधी
आज सेलू येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालय येथे इयत्ता ४ था अ आणि ब च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत महावृक्ष म्हणून परिचित असलेल्या आणि २४ तास प्राणवायू मानवाला उपलब्ध करून देणाऱ्या बोधी वृक्ष म्हणजेच १० पिंपळाच्या झाडाचे वृक्षारोपण करून लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज विठू माऊलीच्या पंढरपूरकडे प्रस्थान होताना आज शाळेतील चिमुकल्यांचे प्रस्थान निसर्गाकडे करण्याचा प्रयत्न विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमिताने शाळेच्या संयोजन समिती व मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने करण्यात आला.या शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन व्हावे व विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणासोबतच पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धा सेलू शहरातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे.या स्पर्धेदरम्यान वृक्षाचे योग्य संगोपन करणाऱ्या वर्गाला सामूहिक ११०० रू.व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.सेलू शहर व परिसरात सुरू असलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमेला सहकार्य म्हणून १० वृक्षाचे पालकत्व स्वीकारून डॉ.श्री व सौ.नाईकनवरे यांनी रू.१००००/- समितीकडे सुपूर्त केले.या उपक्रमासाठी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे श्री हरिभाऊ चौधरी,श्री उपेंद्र बेल्लूरकर,श्रीमती करुणा बागले, मुख्याध्यापक श्री शितोळे,शिक्षक श्री साळवे,श्री चौधरी श्री अनिल कौसडीकर,श्री शंकर राऊत यासह महिला वर्गशिक्षक सौ.रागिणी जकाते, कर्मचारी बांधव,शाळेचे सर्व विद्यार्थी,मोरया प्रतिष्ठान तथा सेलू वृक्ष संवर्धन समितीचे श्री शिवकुमार नावाडे,डॉ श्री व सौ नाईकनवरे,सौ.रुपाली काला,सौ.कोमल काला, सौ.मालानी,श्री अभिजित राजूरकर,श्री सुजित मिटकरी,श्री गजमल,श्री विष्णू बर्वे,श्री कुलकर्णी यासह निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.
वृक्ष संवर्धन समिती
मोरया प्रतिष्ठान,सेलू