प्रतिनिधि सतिष आकात
सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे दिनांक 29 जून 2024 रोजी दुपारी 11:30 ते 12:30 च्या सुमारास संदीप रोहिदास गायकवाड वय 19 वर्ष राहणार देऊळगाव गात येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी पत्राच्या लोखंडी पाईपला ला टॉवेलच्या साह्याने मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे व आरक्षण न मिळाल्यास मला नोकरी मिळेल का नाही या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मयत तरुणाजवळ आरक्षण मिळत नसल्याची चिट्ठी सापडली आहे सदरील तरुण हा जिंतूर येथील शासकीय पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग च्या डिप्लोमा चे शिक्षण घेत होता आत्महत्या ची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळतात घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस जमादार ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी, मनोहर कोपनर आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली तसेच प्रेत देऊळगाव गात येतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणी डॉक्टर अक्षय काळे यांनी उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार शिवदास सूर्यवंशी हे करीत आहेत