सेलू प्रतिनिधी
बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू येथील सातव्या सत्रातील कृषी दुतांमार्फत कृषी दिन साजरा करण्यात आला, कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ होत, शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विदयापीठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी ‘शेतकरी आत्महत्या’ हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते.असे कृषी देताना या वेळी सांगितले कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले तसेच रॅली काढण्यात आली, कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.कृषिदूत करण शिंदे, संतोष शिंदे, रवि खरात, शुभम राठोड, रामेश्वर काळे, गोपाळ नायक यांनी केले. व विशेष मार्गदर्शन प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन.एन. चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा ए. पी. देशमुख यांनी केले .यावेळी गावचे सरपंच, पोलिस पाटील , जि. शाळेचे मुख्याध्यापक व इतर शेतकरी वर्ग यांची उपस्थिती लाभली