सेलू तालुक्यात होणार्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे मूल्यांकन हे जे शासकीय अधिकारी कर्मचारी मोनार कंपनी यांनी सर्वांनी एकूण नऊ खाते बांधकाम
,विनीकरण विभाग,कृषी विभाग व इतर विभागातील मिळून संयुक्त मोजणी करून त्यावर गावात येऊन चावडी वाचन करून संयुक्त मोजणी केली. ते ग्राह्य धरून मा.भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आदेश काढून प्रत्येक घटकाचे मूल्यांकन किंमत ठरवून सादर केलेली आहे. हे ग्राह्य धरून त्यानुसार मोबदला देण्यात यावा. तसेच जमिनीचे मूल्यांकन हे चालू बाजारभावाप्रमाणे देण्यात यावे. तसेच काही अधिकारी हे नियम ढाब्यावर बसून मनाचे नियम लावून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. तरी साहेबांना विनंती संयुक्त मोजणी प्रमाणे झालेले मूल्यांकन ग्राह्य धरण्यात येऊन मोबदला द्यावा अन्यथा आमचा जमीन देण्यास विरोध आहे आम्ही जमीन देणार नाहीत याची दक्षता घ्यावी नाहीतर याबाबतीत शेतकऱ्याला १६ अ प्रमाणे मोबदला नाही दिल्यास सर्व शेतकरी त्यांच्या वडिलोपार्जित जमीन संपादित होत असून शासन कवडीमोल भाव देत आहेत त्यामुळे आम्ही शेतकरी केव्हाही आमच्या शेतात आत्महत्या व आत्मदहन करू शकतात या आंदोलन उद्यापासून आपल्याला शेतात चालू आहे त्याची जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदन सेलू येथे उपजिल्हाधिकारी यांना सेलूतील शेतकरी व शेतकरी संघटनेच्या मार्फत देण्यात आले व त्यांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करीत जोडे मारो आंदोलनही करण्यात आले .या वेळी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.