सेलू तालुक्यातील अवैध धंद्यावर व गुन्हेगारीवर आळा घालण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन…

मराठवाड्यातील सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सेलू तालुक्यामध्ये मागील काही महिन्यापासून राजरोसपणे चालू असलेला मटका,जुगार,वाळू चोरी,गुटका,दारू तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुन्हेगारीही वाढत जात आहे लाखो रुपयांचा महसूल डुबवून भर पावसाळ्यातही वाळू चोरी चालूच आहे. ठिकठिकाणी पानपट्ट्यासारखे मटक्याचे अड्डे चालू आहेत. तसेच सेलू तालुक्यातील अनेक ठिकाणी जुगाराच्या अड्डे चालू झाले आहेत. यावर प्रशासनाचा पाहावा तेवढा दबाव दिसून येत नाही. या मध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून यावर आळा घालावा. व सेलू शहरातील सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा जिवंत ठेवावा या विषयावर तातडीने लक्ष घालावे असे निवेदन परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण बंदरे राज्यमंत्री मा.ना.श्री संजय जी बनसोडे साहेब यांच्याबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी, पोलीस अधीक्षक परभणी उपजिल्हाधिकारी सेलू यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाचे डिजिटल मीडिया अध्यक्ष सेलू सतिश आकात यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button