प्रतिनिधी सतीश आकात
सेलू : दि. 24 शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे मुलींच्या रक्षणाकरता किशोरवयीन मुलींना समुपदेशन करण्यात आले आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे पोलीस कर्मचारी ए.पी. आय. प्रभाकर कव्हळे, ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी,अस्मिता सूर्यवंशी, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती शिरसागर आदी मान्य वर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना कायदा, तक्रार पेटी यांची माहिती दिली. मुलींच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक, निर्भय पथक तसेच काही अडचण आल्यावर ११२ पोलीस दीदी म्हणून संरक्षण पथक आहे. याची माहिती दिली. मुलिंना वैयक्ति क सीमा, संमती आणि सुरक्षितता समजून घेण्यास मदत करण्या साठी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या संकल्पना कळणे अत्यं त महत्त्वाचे आहे. चांग ले स्पर्श अनेकदा सार्व जनिक, दृश्यमान आणि तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत घडतात. जो स्पर्श सौम्य,दयाळू आणि आदरयुक्त असतो. वाईट स्पर्श अनोळखी व्यक्तींकडून किंवा तुम चा विश्वास नसलेल्या लोकांकडून घडतो. जो स्पर्श तुम्हाला अस्व स्थता,भीती, आक्रमक वाटतो. यावर उपाय म्हणून संरक्षणासाठी मुलींनी कराटे शिकले पाहिजे. संवाद कौश ल्ये विकसित केले पाहिजे. खुले व वयानुसार संभाषण केले पाहिजे. वेळोवेळी प्रश्न विचारून चिंता मुक्त व्हायला पाहिजे. थोडक्यात निखळ संवाद आपल्या पाल्यासोबत मैत्रीपूर्ण नात्याने केलं पाहिजे. भीती न वाटता मुलींनी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहि जे. अशा प्रकारे मुलीं ना पोलिस कर्मचाऱ्यां नी योग्य ते मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. कल्पना भाबट केले.