प्रतिनिधी सतिष आकात
बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे व याचा तीव्र निषेध करण्यासाठी सेलू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर सेलू महाविकास आघाडी तर्फे येथे राष्ट्रवादी काँग्रेस( शरद चंद्र पवार पक्ष ),काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हाताला काळ्या पट्ट्या बांधून ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी निषेध करण्यात आला आहे. यावेळी
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करावी अन्यथा महाविकास आघाडी सेलू तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यातून कायदा व सुव्यस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील या प्रकारचे निवेदन तहसील कार्यालय सेलू येथे देत सदरील घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी अशोक नाना काकडे,पवन आडळकर,सुधाकर रोकडे,रामेश्वर बहिरट, रघुनाथ बागल,विठ्ठल काळबांडे,निर्मलताई लीपने,मुकुंद लहाने,मंगलताई कथले, शेख दिलावर,विनोद तरटे,आनंद डोईफोडे,वैभव वैद्य,सचिन धापसे,नरसिंग हरणे,गौस लाला,विठ्ठल महाराज कारके,शेषराव वाघमोडे,संजय गायके,रमेश डख,संतोष ठाकूर,गोविंदराव सोळंके,रमेश शिंदे,अरुण ताठे,अंकुश सोळंके,विष्णू नाईकनवरे, अशोक उफाडे,लिंबाजी कलाल,धारोजी धाबे,परवेज सौदागर,रुपेश पवार,गौतम साळवे,योगेश काकडे,पंकज चव्हाण,दत्ता गायके,रामेश्वर पौळ,रामकृष्ण शेरे,उद्धव पौळ,दत्तू सिंग ठाकूर,बालाप्रसाद राठोड, अशोक घुले,तुकाराम रोडगे,इरफान लाला, दत्तराव कांगणे,योगेश कुलकर्णी,लालू कुरेशी,नियाज भाई,शेख भाई गुत्तेदार, तोफिक सिद्दिकी,मंच आंभूरे,माऊली राठोड,अमोल आडे,श्याम मुंडे,सचिन राऊत,बाबासाहेब भाबट,बाबा भदर्गे,शोभा गुंजकर,द्वारकाबाई राखुंडे,छाया दत्ता बेंद्रे, अर्चना उफाडे, ज्योती उफाडे, इंदुमती शिंदे, सोजरबाई लिपणे यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.