@ विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम
सेलू / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा ,कलेच्या माध्य मातून बाल मनाची जडणघडण व्हावी तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी विवेकानंद विद्यालयात गणपती व बैल बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना बैल बनविणे व उच्च प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी गणपती तयार केले.महेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे उद्घाटन हरिभाऊ चौधरी यांच्या हस्ते झाले.मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.हरिभाऊ चौधरी यांनी मुलांच्या अंगीभूत कलेचे कौतुक केले.
कार्यशाळेच्या आयोजनात व यशस्वीते साठी अनिल कौसडीकर ,गजानन साळवे ,रागिणी जकाते ,काशिनाथ पांचाळ ,मंगेश खरात यांनी प्रयत्न केले.