@ विद्यार्थ्यांशी साधला संवाद
सेलू / प्रतिनिधी
आजची मुले ही भविष्यातले जबाबदार नागरिक आहेत, मुलांवर संस्कार हे शाळेतूनच होतात,शाळा मुलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणतात कारण आजचा बालक उद्याचा पालक बनतो असे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे .येथील विवेकानंद विद्यालयात त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच ,शाळेतील भौतिक सुविधा ,शैक्षणिक उपक्रम ,शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शाळेच्या रस्त्याचे काम प्रगतीचा दिशेने आहे. त्याचाही आढावा त्यांनी घेतला.संस्थेच्या वतीने हरिभाऊ चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले.
संस्थेचे हरिभाऊ चौधरी ,आमदार मेघना बोर्डीकर ,अशोक अंभोरे ,रवी डासाळकर,कपिल फुलारी ,मु.अ.शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सुत्रसंचालन व आभार विजय चौधरी यांनी केले.