दिनांक 18,09,2024 रोजी आगारप्रमुख यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सेलू येथील बस स्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनिक्षेपक मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वयस्कर लोक, महिला, बसने येजा करणारे शाळेतील विद्यार्थी, तसेच ज्यांना वाचता येत नाही. अशांना अनेक अडचणी येत आहेत. सेलू हे मोठे शहर असून बसस्थानकाची इमारत खूप मोठी आहे. पण ध्वनिक्षेपक बंद असल्यामुळे ही फक्त शोभेची वस्तू बणली आहे. नाही तरी सेलु बस स्थानकावरील ध्वनिक्षेपक ताबडतोब सुरू करण्यात यावे व प्रवाशांची गैरसोय थांबवावी. तसेच शिरूर बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नाही व जी आसन व्यवस्था आहे ती मोडकळीस आली आहे त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने जमिनीवर बसावे लागत आहे करोडो रुपये खर्चून बस स्थानकाची नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे पण त्यात सुविधांचा अभाव आहे तरी तात्काळ बस स्थानकातील ध्वनिक्षेपक व आसन व्यवस्था येत्या १५ दिवसात करण्यात यावी नसता सेलू बस स्थानकामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जयसिंग शेळके, शिवम गटकळ, त्रिंबक पितळे, संजय सोळंके, वैभव आवटे, किसन खनपटे, दत्ता गाते व विद्यार्थी उपस्थित होते