सेलू (प्रतिनिधी):
सेलू तालुका परभणी जिल्ह्याचे क्रीडा व सांस्कृतिक केंद्र आहे. या सांस्कृतिक केंद्राला आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे. आमच्या विधिमंडळ सहकारी आमदार मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात येथील खेळ, खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासासोबत, सेलू तालुक्यातील क्रीडा सुविधेच्या संदर्भात राहिलेली कामे, क्रीडा संकुल इनडोअर हॉल राहिलेला निधी अंतिम टप्प्यात असून लवकरच वर्ग होईल; सेलूकर खेळाडू , क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांनी निश्चिंत राहावे, आम्ही सोबत आहोत, आपली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी परभणी येथे केले
सेलू तालुक्यातील क्रीडा प्रश्न संदर्भात महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे यांच्या सोबत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आ. मेघनादीदी साकोरे - बोर्डीकर, आ. राजेशदादा विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी.डी.सोन्नेकर, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, बाळू बुधवंत उपस्थित होते.