प्रतिनिधी सतिष आकात
मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी येथे बसले होते.अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येती खालावली असून त्यांना उपचारादरम्यान दवाखान्यामध्ये ऍडमिट करावा लागेल आणि पुन्हा एकदा मराठा समाज हा पेटून उठलेला आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे. आता विधानसभा च्या पार्श्वभूमीवर गावोगावी सर्वपक्षीय नेत्यांचे दौरे चालू आहेत तरी सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी य आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी पासून सेलू तालुक्यातील दिग्रस जहांगीर येथे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय व पुढार्यांचे गावांमध्ये प्रवेश हा बंद करण्यात आला असून सर्व मराठा समाजाच्या वतीने शपथ घेऊन आज निदर्शने करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज डिग्रस व सेलू तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते