आज सेलू येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तिरूमला तिरुपती श्री बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये जनावराची चरबी तसेच माशाचे तेल व इतर भेसळयुक्त वस्तू आढळल्या आहेत. तिरुमला तिरुपती बालाजी हे जगातील करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान आहे व दरवर्षी या ठिकाणी करोडो लोक दर्शन घेतात व प्रसाद घेतात पण अशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांची चरबी टाकून हिंदू धर्म बाटवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारे भेसळयुक्त प्रसाद देणे म्हणजे हिंदू धर्मावर एक प्रकारचे आक्रमणच आहे. यामुळे समस्त हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावले आहेत. या भेसळयुक्त लाडू प्रसाद प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी व हा प्रकार करणाऱ्या करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यानंतर असा प्रकार होणार नाही. नसता समस्त हिंदू धर्मातील लोकांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
यावेळी जयसिंग शेळके, व्यंकटेश काबरा, अविनाश बिहाणी, अनूप कान्हेकर, विष्णू काष्टे, माणिक शेळके, रामेश्वर गाडेकर, भारत इंद्रोके,मोहन गाडेकर, राजन पवार, दिपक लाटे उपस्थित होते..