
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथे किशोर गट राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे
या स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्या सहभागी होणार असून या संघाचा दहा दिवसाचा प्रशिक्षण शिबिर नूतन विद्यालय इंडोर हॉल येथे करण्यात आले होते.
परभणी जिल्हा संघांची साखळी सामन्यात सातारा, नाशिक, संभाजीनगर सोबत लढत होणार आहे.
जिल्हा संघ:- ज्ञानदीप घांडगे (कर्णधार) सोमेश्वर खोसे, हनुमान जाधव, सुनीलकुमार कांबळे,आर्यन पवार,विकास राठोड,किशोर जगताप, नितीन राठोड,राहुल चव्हाण ,पार्थ गिरी,
बालाजी जर्नाधन राठोड,
संदेश शेषेराव सातपुते
संघ व्यवस्थापक:-रत्नेश घांडगे,प्रशिक्षक:राहुल घांडगे
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे अध्यक्ष परभणी जिल्हा कबड्डी संघटना आमदार सुरेशराव वरपुडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी कोषाध्यक्ष मंगल पांडे, पी. आर. जाधव, भारत धनले, माधव शिंदे, प्रकाश हारगांवकर, नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारणी सदस्य डॉ .प्रा.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, के. के .देशपांडे , गणेश माळवे , प्रशांत नाईक यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.