
सतत आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांना सेलू नगरीमध्ये कायमच चर्चेत असलेले माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व त्यांच्या मित्र मंडळातर्फे व
साईबाबा मंदिर संस्थान महेश नगर सेलू यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेले महाअभिषेक आज संपन्न झाले.अतिशय नयनरम्य सोहळा श्री साईबाबा मंदिर मध्ये पार पडला.या वेळी ३५१ यजमानांचा डोळ्यातील आनंद पाहण्यासारखा होता.
अभिषेकासाठी प्रमुख 12 नद्यांच्या पाणी आणण्यात आले होते, व सांगता 5 आरत्याने करण्यात आली.
विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे अभिषेकास लागणारी सर्व सामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती.

महाशिवरात्रीला महाअभिषेकची संधी उपलब्ध करून दिली या बद्दल सर्व यजमानांनी विनोद बोराडे मित्र मंडळाचे आभार व्यक्त केले.