दिनांक 24.2.2025 रोजी श्री गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक संमेलन कार्यक्रम पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन गो. बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रल्हादराव कान्हेकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष श्री विठ्ठलराव डख उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुख्याध्याक चंद्रशेखर नावडे कस्ट्राईब शिक्षक संघटनेचे माराठवाडा कार्याध्यक्ष धम्मपाल उघडे सर,गुगळी धामणगावचे सरपंच अतुल डख,
संस्था सदस्य सुरेश अप्पा डख,सुभाष बोबडे गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सह सुनील बापू डख,संस्था सचिव रमेश डख, सिमुर गव्हाणचे सरपंच विष्णू उगले,डिजिटल मीडिया अध्यक्ष सतीश आकात मा.विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल पवार प्रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज ब्रम्हराक्षे
आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री प्रल्हाद काणेकर यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने 51 हजार रुपये देणगी दिली.
वार्षिक स्नेहसंमेनात विद्यार्थ्यांनी
शिवरायांचा राज्यअभीषेक सोहळा असा अनोखा नृत्य सादर केला.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक श्री आबासाहेब गव्हाणे सर,श्री लक्ष्मण ताल्डे सर,अश्विनी जोशी मॅडम,उगले मॅडम शामबाला वैष्णव मॅडम,निकिता नवघरे,कर्मचारी अनिल अनिल ब्रह्मराक्षे केशव कवडे जगताप राजेभाऊ मोरे पावन मोरे आदींनी परिश्रम घेतले.