
सेलू – श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले.
कार्यक्रमात मराठी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका अश्विनी हिबारे, अयोध्या चौरे, अनिता घुगे यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी हिबारे यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मराठी राजभाषा दिनाविषयी माहितीपर भाषण, काव्यवाचन, एकपात्री नाटक, वैयक्तिक नृत्य, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सादरीकरण तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित काव्यवाचन यांचा समावेश होता. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त गीत गायन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता लाटे व सृष्टी कदम या विद्यार्थिनींनी केले, तर आभार अयोध्या चौरे यांनी मानले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे यांनी मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, मीरा मेरिंडा उपस्थित होते. प्रिन्स इंग्लिश स्कूल तर्फे मराठी भाषा गौरव दिन अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला.