
खुल्या क्रिकेट स्पर्धेत 52 संघांचा सहभाग,अर्जुन बोरूळ मित्रमंडळाचा उपक्रम..
(सेलू ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जन्मोत्सवा निमित्य अर्जुन बोरूळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील 52 संघांनी सहभाग नोंदऊन मोठा प्रतिसाद दिला.
19 फेब्रुवारी प्रारंभ झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत 26 फ्रेब्रुवारी रोजी देवा इलेव्हन विरुद्ध लिंगा वॉरीअर्स असा अंतिम सामना रंगला यामध्ये देवा इलेव्हन संघाने लिंगा वॉरीअर्स पराभव करून
31 हजार रुपये व बोर्डीकर चषक , तर उपविजेत्या संघाला 21 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ संजय रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून संजय लोया, संयोजक अर्जुन बोरूळ,मनिष कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद खारकर, भाऊसाहेब सोनवणे,नरेंद्र दिशागत , विठ्ठल कोक्कर , कपील फुलारी रामेश्वर काजळे , यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते अजय काष्टे व अभिजित चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज , सर्वोत्कृष्ट फलंदाज , व मालिकावीर पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
तसेच नितीन क्रिकेट ॲकॅडमीचे संदीप लहाने , गजानन शेलार , कपील ठाकूर , सलमान सिद्दीकी, विजय वाघ, पांडूरंग कापसे, गजानन गरुड, दांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन बोरूळ , सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर ईश्वर तावरे यांनी आभार मानले.
स्पर्धा यशस्वीते साठी ,गणेश गोरे, बाबासाहेब मोळे, दिपक पवार , गोविंद हरने,कृष्णा बोरूळ, आपा नावाडे ., गणेश भागडे , चेतन गोरे,सतीश भोसले सतीश सोलापुरे, व्यकेतेश भिसे,आदी मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम .