छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी संदीप शिंदे
छत्रपती संभाजी नगर राजा लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब निवडणूक अधिकारी देवेंद्र टी. कटके शिक्षणाधिकारी एम के देशमुख साहेबयांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्व माध्यमिक प्राथमिक शाळेत चला मतदान करूया या उपक्रमांअतर्गत मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर असे फलक तयार करून एकपात्री नाटका द्वारे स्वामी ब्राह्मानंद विद्यालय पिंपरी राजा येथे विद्यार्थ्यांनी मतदारांना साद घातली व न चुकता मतदान करण्याचे आव्हान केलेया प्रसंगी स्वामी ब्रह्मानंद विद्यालयाचे प्रधानाचार्य श्री दिनेश देशपांडे सर साखरे सर कुबेर सर सोनवणे सर थोरे सर बोंगाणे सर साळवे सर श्रीमती रामोळे मॅडम सोनाली मॅडम संदीप शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील घोरपडे सुनील भाऊ झाजरी अजय सिंह चव्हाण विक्रम पाटील वर्धमान सोनटक्केआदी शालेय समिती सदस्यांनी सहभाग नोंदविला मोहिमेच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते